अमरापूरला गणेशोत्सवानिमित्त 51 जणांचे रक्‍तदान

शेवगाव – तालुक्‍यातील आदर्शगाव म्हणून ओळख असलेल्या अमरापूर येथे “एक गाव एक गणपती’ उपक्रम राबविण्यात आला आहे. विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. गणेशोत्सवानिमित्त नुकत्याच घेण्यात आलेल्या रक्‍तदान शिबिरात 51 जणांनी रक्‍तदान केले.

अमरापूर या गावाने ग्रामस्थांच्या एकजुटीतून गेल्या पाच वर्षांत स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन व ग्रामविकासात आदर्शवत व रचनात्मक कार्य केले. जिल्ह्यासह राज्यात एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे. गणेशोत्सवातही दरवर्षी “एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबवून सामाजिक सलोखा, शांतता व गावकऱ्यांच्या एकजुटीचा संदेश गावाने दिला आहे. नगर येथील पालिकेच्या रक्‍तपेढीच्या डॉ. रूपाली कुलकर्णी यांच्यासह तंत्रज्ञ पल्लवी मोरे, श्रीमती सांगळे, सिस्टर श्रीमती वैद्य, श्रीमती तोडमल, कर्मचारी मंजुरे, साळवे यांनी रक्‍तदात्यांचे रक्‍तसंकलन केले. रक्‍तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.

अत्यवस्थ रुग्णांना रक्‍त वेळेवर मिळाले तर जीवनदान मिळू शकते, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. सरपंच विजय पोटफोडे, विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप बोरुडे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी, विराट बोरुडे, अमोल बोरुडे, गणेश सुसे, सचिन कळमकर, धनंजय खैरे, लालासाहेब कळमकर, जालिंदर बोरुडे, संभाजी वाघ, राजेंद्र चौधरी, रवींद्र फलके, अनिल बोरुडे, अनंत भुजबळ यांच्यासह ग्रामस्थ व तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)