अमरनाथ यात्रेसाठी एक लाख 70 हजार भाविकांची नोंद

जम्मू – यावर्षीची अमरनाथ यात्रा 28 जून पासून सुरू होणार असून ती दोन महिने चालणार आहे. या यात्रेसाठी आत्तापर्यंत 1 लाख 70 हजार भाविकांनी आपली नावे रजिस्टर केली आहेत. त्यात 2122 विदेशी यात्रेकरू आहेत. ही यात्रा दोन महिने चालणार आहे. 26 ऑगस्टला यात्रेचा समारोप होईल. दर वर्षी पेक्षा यावेळी ही यात्रा 20 दिवस अधिक चालणार आहे.

या यात्रेसाठी 1 मार्च पासून यात्रेकरू रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पंजाब नॅशनल बॅंक, जम्मू काश्‍मीर बॅंक आणि येस बॅंकेच्या देशभरातील एकूण 440 शाखांमधून या रजिस्ट्रेशनची सोय करण्यात आली आहे. यात्रेसाठी हेलिकॉप्टर बुकींगही सुरू झाले आहे. यात्रेकरूंनी प्रत्यक्ष यात्रा मार्गवर रजिस्ट्रेशन करण्याचीही सोय उपलब्ध करून देण्यात आली असून ही सोय वैष्णवदेवी धाम, सरस्वती धामल जम्मू हाट, आणि गीताभवन राम मंदिर या ठिकाणी उपलब्ध असेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)