अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था आज रवाना होणार

जम्मू – अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जथ्था उद्या भगवतीनगर बेस कॅम्प पासून रवाना होणार आहे. यंदाच्या यात्रेसाठी आत्तापर्यंत सुमारे दोन लाख भाविकांनी आपले रजिस्ट्रेशन केले आहे. यंदाच्या यात्रेवर दहशतवादी हल्ल्यांचे सावट असल्याने यंदा सुरक्षेची अभुतपुर्व व्यवस्था करण्यात आली आहे. बालताल आणि पेहलगाम या दोन्ही मार्गावरून यात्रेकरूंना उद्यापासून यात्रेसाठी सोडण्यात येणार आहे.

26 ऑगस्ट रोजी यात्रेचा समारोप होणार आहे. जम्मू काश्‍मीरचे पोलिस महानिरीक्षक एसडी िंसग जमवाल यांनी म्हटले आहे की या यात्रेची सर्व तयारी प्रशासनाने पुर्ण केली आहे. पोलिसांनीही पुरेसे सुरक्षा बंदोबस्त तैनात केले आहेत. पोलिस व निमलषकरी दलाचे तसेच लष्कराचे असे एकूण चाळीस हजार जवान यात्रेकरूंची रक्षण करण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. दोन्ही मार्गांवरून रोज साडे सात हजार भाविकांना सोडले जाणार असल्याची माहितीहीं त्यांनी दिली. गेल्यावर्षी 2 लाख 60 हजार भाविकांनी अमरनाथ यात्रा पुर्ण केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)