अमनोरा करंडक बॅडमिंटन स्पर्धा: दानिका, रेवा, आरती यांची आगेकूच

पुणे: दानिका पळसुले, रेवा निलंगेकर, आरती चौगले यांनी पीवायसी आणि हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशन आयोजित अमनोरा कप बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून आगेकूच कायम राखली.

पीवायसीच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत रविवारी 13 वर्षांखालील मुलींच्या एकेरीतील दुसऱ्या फेरीत अग्रमानांकित आरती चौगलेने शर्वा बेद्रेवर 15-6, 15-9 असा सहज विजय मिळवला. आता तिची तिसऱ्या फेरीत पवित्रा गद्दमविरुद्ध लढत होईल. पवित्राने साची मुंदडावर 15-3, 15-12 अशी मात केली. दानिका पळसुले हिने ईश्वरी आंचवालेवर 15-3, 15-8 अशी मात केली, तर रेवा निलंगेकरने जिज्ञासा चौधरीवर 15-13, 6-15, 15-14 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. दुसऱ्या मानांकित अनन्या गाडगीळने दिशा कांकरियावर 15-4, 15-0 अशी मात केली. आता तिसऱ्या फेरीत तिची लढत सेजल ओझाविरुद्ध होईल. सेजलने केतकी हरदासवर 9-15, 15-8, 15-10 अशी मात केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर, स्पर्धेतील 15 वर्षांखालील मुलांच्या एकेरीत अग्रमानांकित प्रथम वाणी याने तुषार माडिवालरवर 15-7, 15-4 असा सहज विजय मिळवला. यानंतर अनिश लाटकरने यश डांगीवर 15-11, 15-3 अशी, तर ऋत्विक गोरक्षकरने रजत कुलकर्णीवर 15-14, 14-15, 15-12 अशी, तर देवेश गोएलने चैतन्य काळभैरववर 15-7, 15-13 अशी मात केली. श्रेयस सानेने क्षीतिज कोकाटेचे आव्हान 15-8, 15-9 असे सहज परतवून लावले. अभय पवारने अर्जुन गायकवाडवर 15-8, 14-15, 15-9 असा संघर्षपूर्ण विजय मिळवून तिसरी फेरी गाठली. चौथ्या मानांकित सोहम भुतकरने पार्थ कडवर 15-8, 15-10 असा, तर रोनक गुप्ताने आदित्य देशमुखवर 15-8, 15-3 असा विजय मिळवला.

सविस्तर निकाल :

11 वर्षांखालील मुली : दुसरी फेरी – जुई जाधव वि. वि. शुभ्रा वैशंपायन 15-9, 15-8; रुही भिसे वि. वि. तन्वी उजवणे 15-4, 15-4; सायली अलोनी वि. वि. काव्या शर्मा 12-15, 15-14, 15-7; पूर्वा वलवांडे वि. वि. वर्दा शिंदे 15-9, 15-5; स्वामिनी तिकोणे वि. वि. यशस्वी काळे 15-8, 15-7; ईरा आपटे वि. वि. जेसिका जॉन 15-13, 13-15, 15-11; पीयूषा फडके वि. वि. सृष्टी धारवडकर 15-4, 15-2; सुखदा लोकापुरे वि. वि. पवनी इनामदार 15-5, 15-6; सिया बेहेडे वि. वि. तन्वी गुप्ता 15-13, 15-7; प्राची पटवर्धन वि. वि. शिवांजली थिटे 15-10, 10-15, 15-9; अंजली तोंडे वि. वि. सफा शेख 15-6, 15-6; जुई हळणकर पुढे चाल वि. अंजली कुलकर्णी; प्रज्वलिता जोशी वि. वि. रिद्धीमा जोशी 15-0, 15-1; प्रांजल सातपुते वि. वि. दुर्वा दर्बन 15-5, 15-1.

13 वर्षांखालील मुले : दुसरी फेरी – आद्य पारसनीस वि. वि. पार्थ जाधव 15-1, 15-0; नमन सुधीर वि. वि. ओजस पवार 15-8, 15-6; ईशान केळकर वि. वि. अद्वैत बारवकर 15-7, 15-9; कृष्णा बोरा वि. वि. वेदांत सहस्त्रबुद्धे 15-8, 15-2; देवेश गोएल वि. वि. सोहम खटपे 15-3, 15-4; सुदीप फणसळकर वि. वि. अन्वय गुरुजी 15-8, 15-6; नील लुणावत वि. वि. मल्हार लिमये 15-9, 15-11; अर्थव चिवटे वि. वि. रुग्वेद मेथे 15-5, 15-6; आदित्य देशमुख वि. वि. अथर्व कुलकर्णी 15-12, 15-5; मल्हार मोकाशी वि. वि. सर्वेश मुळ्ये 15-1, 15-6; सार्थक शेलार वि. वि. सोहम कामठे 15-12, 15-11; यशवंत साळोखे वि. वि. अजिंक्‍य कुलकर्णी 15-10, 15-14; अर्चित दांडेकर वि. वि. मयांक झपके 15-6, 15-6; सिद्धान्त कोल्हाडे वि. वि. ऋषभ चोरडिया 15-7, 10-15, 15-12; सार्थक पाटणकर वि. वि. आदित्य डोंगरे 15-8, 15-8; यशराज कदम वि. वि. विराज सराफ 15-5, 15-3; ध्रुव मासळेकर वि. वि. आर्या मुळ्ये 15-12, 15-14; वेदांत नातू वि. वि. आर्यन दरक 15-1, 15-5; ऋषीकेश झाडबुके वि. वि. सुजल व्यास 15-14, 15-9.

13 वर्षांखालील मुली : दुसरी फेरी – नंदिनी पाटील पुढे चाल वि. रिद्धीमा सहरावत; श्रिया उत्पट वि. वि. रिद्धी पाटील 15-4, 15-2; आंचल जैन वि. वि. विदुला बनसोडे 15-4, 15-6; जुई जाधव वि. वि. निधी चितलेय 15-12, 15-8; सिया रासकर वि. वि. श्रेया मेहता 15-7, 15-5; पूर्वा पाबळे वि. वि. अंतरा ढोरे 15-7, 15-11; संजना अंबेकर वि. वि. ओजल रजाक 15-10, 15-5; सुखदा लोकापुरे वि. वि. याश्वी पटेल 15-7, 15-8; राशी जैन वि. वि. वसुधा यादव 15-8, 15-14; अनन्या अगरवाल वि. वि. सोनिया पगारे 15-2, 15-7; रिया भालेराव वि. वि. अर्पिता आर्देय 15-12, 15-10.

पुरुष एकेरी : पहिली फेरी – नचिकेत दालवाले वि. वि. सुरज साठे 15-8, 15-4; पार्थ थट्टे पुढे चाल वि. निनाद जोशी; राजू ओव्हळ वि. वि. शुभम काळे 15-12, 15-12; विपूल अन्वेकर वि. वि. दिव्यांशू आठल्ये 15-14, 15-14; अमित पटेल वि. वि. शुभम चातलवार 8-15, 15-9, 15-13; हर्ष गाडिया वि. वि. विवेक मान 15-10, 15-11; रोहित पिटके वि. वि. शुभम देशमाने 15-3, 15-9; सोहम कुलकर्णी वि. वि. राहुल पाटील 15-5, 15-7; सिद्धान्त शाह वि. वि. नयन जगताप 15-5, 15-5; ओंकार म्हाळसकर वि. वि. प्रफुल भांडारी 15-8, 15-12; आशिष नेल्लुतला वि. वि. सिद्धेश शर्मा 15-3, 15-11; राघव खरे वि. वि. शैलेश स्वामी 15-1, 15-3; सतीश पाटील वि. वि. मनमोहन छकोळे 15-3, 15-4.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)