अभ्यास मंडळांचे अध्यक्षपदांसाठीच्या निवडणुकीत 5 अर्ज अवैध

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखांच्या विविध विषय अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदांसाठीच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेत 10 वैध तर, 5 अवैध अर्ज ठरविण्यात आलेले आहेत.

विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेमध्ये समाविष्ट असलेल्या प्रत्येक विषयासाठी किंवा विषयांच्या गटासाठी असलेल्या अभ्यास मंडळांच्या सदस्यांमधून एका सदस्याची अभ्यास मंडळावरील अध्यक्ष पदावर निवड करण्यात येत असते. यासाठी विद्यापीठाकडून निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सुरूवात झालेली आहे. येत्या 30 नोव्हेंबरला या विविध विषयांच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष पदांसाठी निवडणूका घेण्यात येणार आहे. त्यापूर्वीची उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया विद्यापीठाच्या निवडणूक विभागात नुकतीच पार पडली आहे. यात 10 अर्ज वैध (ग्राह्य) तर, 5 अर्ज अवैध (अग्राह्य) ठरविण्यात आले आहेत.

वनस्पतीशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदासाठी प्रा. बी. एम. गायकर यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आला असून प्रा. बी. पी. शिंदे यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. रसायनशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदासाठी प्रा. अविनाश कुंभार यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला असून प्रा. विजय जगन्नाथ मेदाणे यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. संगणक विज्ञानासाठी प्रा. एस. डी. ढोले, भूगोल विषयासाठी प्रा. ज्योतीराम मोरे, इलेक्‍ट्रॉनिक विज्ञान विषयासाठी प्रा. डी. सी. घारपूरे या उमेदवारांचे विषयनिहाय प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाले असून हे अर्जही अवैध ठरविण्यात आले आहेत.

गणित विषयासाठी प्रा. एस. बी. गायकवाड, सूक्ष्मजीवशास्त्र विषयाकरीता प्रा. गिरीश फटाडे, भौतिकशास्त्रासाठी प्रा. महेंद्र मोरे, प्राणीशास्त्र विषयाकरीता प्रा. अभय खंडागळे, औषधनिर्माण रसायनशास्त्र विषयासाठी प्रा. सोहन चितलांगे, औषधशास्त्र विषयासाठी प्रा. प्रविण चौधरी, औषधनिर्माण विषयासाठी प्रा. चंद्रशेखर उपासणी, औषधोपचार विषयासाठी प्रा. राजेंद्र भांबर आदींचे विविध विषयनिहाय अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदांचे अर्ज वैध ठरविण्यात आलेले आहेत. उमेदवारी अर्जांच्या वैधतेच्या संदर्भात कोणतेही वाद किंवा शंका असल्यास विद्यापीठांच्या कुलगुरूंकडे अपील करावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)