अभ्यासाशिवाय गणित विषयाचे आकलन अशक्‍य

प्रा. गायकवाड ः मंचरच्या आवटे महाविद्यालयात गणित दिवस साजरा

मंचर-सखोल अभ्यासाशिवाय गणित विषयाचे आकलन अशक्‍य आहे. गणित विज्ञानाच्या सर्व शाखांचा पाया आहे. गणित विषयात प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी आपले करियर यशस्वीपणे घडवू शकतात, असे मत प्रा. डॉ. नानासाहेब गायकवाड यांनी व्यक्त केले.
मंचर (ता. आंबेगाव) येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात गणित दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने प्रथम व द्वितीय वर्षाच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयावरील प्रश्‍न मंजुषेच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गणित दिवसाचे आयोजनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आर्टस्‌, कॉमर्स, सायन्स कॉलेज नारायणगाव येथील गणित विभागप्रमुख प्रा. बाळासाहेब दरेकर उपस्थित होते. अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य नानासाहेब गायकवाड उपस्थित होते. प्रा. बाळासाहेब दरेकर यांनी गणित विषयामधील भविष्यातील संधी या विषयावर व्याख्यान दिले. प्रश्‍नमंजुषेतील विजयी स्पर्धकांच्या संघांना महाविद्यालयाच्या वतीने विविध पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. त्यामधील पुरस्कार विजेते विद्यार्थी पुढीलप्रमाणे-प्रथम क्रमांक श्‍वेता हिंगे, प्रांजल अरगडे, तनुजा शिंदे, द्वितीय क्रमांक -हर्षदा तांबे, नेहा राजगुरु, अनुजा कणसे, तृतीय क्रमांक-ओंकार खोकराळे, आकाश निर्मळ, अवधुत गावडे. यावेळी प्रा. नामदेव गाडेकर, प्रा. डॉ. सदाशिव बोलभट, प्रा. डॉ. नामदेव आडमुठे, प्रा. स्वाती लांडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गणित विभागप्रमुख प्रा. विलास फसाले, प्रा. मंगेश रोकडे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्रा. विलास फसाले यांनी केले. प्रा. मंगेश रोकडे यांनी आभार मानले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)