अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करा

प्रतापराव वळसे पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

मंचर-शालेय जीवनात अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करून विद्यार्थ्यांनी देशाचे नाव उज्ज्वल करावे. अभ्यास आणि खेळ यांची सांगड घातली तर विद्यार्थी जीवनात नक्कीच यशस्वी होतील, असे प्रतिपादन निरगुडेश्‍वर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव वळसे पाटील यांनी केले.
निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालय व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात नामदेव मारुती वाळुंज यांच्या स्मृती दिनानिमित्त दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा स्पर्धेचे उद्‌घाटन करताना प्रतापराव वळसे पाटील बोलत होते. यावेळी नामदेव वाळुंज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास त्यांच्या कुंटुंबाचे वडगाव काशिंबेग येथील कैलास वाळुंज, प्रदीप वाळुंज, प्रशांत वाळुंज, महेश डोके, सुधीर शेवाळे, सुरेंद्र डोके, माजी सरपंच बाळासाहेब सैद व मारुती डोके, सचिन वाळुंज उपस्थित होते. तसेच सरपंच उर्मिला संतोष वळसे पाटील, उपसरपंच दादाभाऊ टाव्हरे, अध्यक्ष सुरेश आवारी, आनंदराव वळसे पाटील, सयाजी टाव्हरे, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्या सुनंदा गोरे यांनी केले. सूत्रसंचालन मोहन दरेकर व पर्यवेक्षक संतोष वळसे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)