अभ्यासाएवढेच खेळालाही महत्व द्या : जिल्हाधिकारी

सातारा – खेळ हा बुद्धिला तल्लक ठेवतो, त्यामुळे प्रत्येक मुला, मुलींनी मैदानी खेळ खेळणे आरोग्यासाठी खुपच महत्वाचे आहे. ज्या मुलांचे स्वास्थ्य उत्तम त्या मुलांची स्मरण शक्ती, इच्छा शक्ती उत्तम राहते, त्यामुळे अभ्यासाएवढेच खेळालाही महत्व द्या, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केले.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे दि. 5 ते 7 डिसेंबर 2018 या कालावधीत येथील श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुलात आयोजन करण्यात आले आहे. या बाल महोत्सवातील खो-खो च्या सामन्याचे जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी उद्‌घाटन करुन महोत्सवाची सुरुवात केली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा कोषागार अधिकारी हणमंत शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उज्वला माने, महिला आयोगाच्या ड मनिषा बर्गे आदी उपस्थित होते.

-Ads-

जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवात 240 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. या मोहत्सवात कबड्डी, खो-खो, क्रिकेट, धावणे, रिले, गोळाफेक, थाळी फेक, लिंबू चमचा, संगीत खुर्ची, उंच उडी स्पर्धांबरोबरच बुद्धीबळ, निबंध, वकृत्व, चित्रकला अशा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत.

या बालमहोत्सवात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून विजेता ठरलेल्या विजयी व उपविजयी संघाना शिल्ड, ट्रॉफी, स्पर्धकांना प्रमाणपत्र व मेडल देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी बालकांना प्रशिस्तपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम 7 डिसेंबर रोजी असून याच दिवशी बाल महोत्सवाचा समारोपही होणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)