अभिषेक बच्चन पुन्हा एकदा झाला ट्रोल

अभिषेक बच्चनला सोशल मिडीयावर फारसे ऍक्‍टिव्ह रहायला आवडत नाही. कारण तिथे उगाचच एकमेकांची खेचाखेची चाललेली असते. अलिकडे अभिषेकला एका युजरने ट्रोल करायला सुरुवात केली होती. कारण काय, तर अभिषेक अजूनही आपल्या पालकांबरोबरच रहातो आहे. अभिषेक बच्चनच्या लाईफ फिलॉसॉफीला टॅग करताना हा युजर म्हणाला की लोकांनी स्वतःबाबत वाईट वाटून घेऊ नये. केवळ अभिषेक बच्चनला आठवून पहावे. तो अजूनही आपल्या पालकांबरोबरच रहातो आहे.


खरे तर यामध्ये अभिषेकला आनंद वाटावा अशीच गोष्ट या युजरने सगळ्यांसमोर मांडली होती. आई वडिलांबरोबर रहाणे ही काही लाज वाटण्यासारखी गोष्ट निश्‍चित नाही. त्याप्रमाणे अभिषेकनेही या कॉमेंटना रिप्लाय केले आहे. पालकांबरोबर रहाणे ही बाब आपल्यासाठी अभिमान वाटावी अशीच आहे. आई वडिलांनी माझ्यासाठी खूप काही केले आहे. मी त्यांच्यासाठी नेहमीच हजर असतो. स्वतःला आनंद वाटण्यासाठी जरा वेगळा प्रयत्न करा.

-Ads-

अभिषेकने इतक्‍या परखडपणे आणि स्पष्टपणे उत्तर देऊन या युजरला निरुत्तर केले. हे बघून त्याचे फॅनही खूष झाले आहेत. त्यांनी अभिषेकला सपोर्ट करायला सुरूवात केली. त्यापैकी काहींनी अभिषेकचे कौतुक करताना अशा खोचक प्रश्‍नांना उत्तरे कशाला देतोस, असा प्रश्‍न एकाने विचारला, त्यावर काही वेळा लोकांना त्यांची जागा दाखवून द्यायला लागते, असे उत्तर अभिषेकने दिले.

बऱ्याच वर्षांपूर्वी 2005 साली डेविड लेटरमॅनच्या टॉक शोमध्ये ऐश्‍वर्या रायलाही पालकांबरोबर रहाण्यावरून अशाच प्रकारचा खोचक प्रश्‍न विचारला गेला होता. त्यावर आई वडिलांबरोबर रहाणे ही आपल्या देशाची संस्कृतीच आहे. डिनरच्यावेळी आई वडिलांना भेटण्यासाठी अपॉईंटमेंट घेतली जात नाही, असे उत्तर ऐश्‍वर्याने दिले होते. अभिषेकला “फ्लॉप हिरो’ म्हणून सोशल मिडीयावर हिणवले जायचे. तर ऐश्‍वर्या सारख्या हिरोईनने अभिषेकबरोबर लग्न कसे काय केले ? असे म्हणूनही काही युजर अभिषेकला डिवचायचे. सध्या त्याने “मनमर्जियां’ या आपल्या सिनेमाचे शुटिंग पूर्ण केले आहे. त्यामध्ये अभिषेकबरोब्र तापसी पन्नू असणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)