अभिषेक बच्चनच्या नवीन लूकवर बीग बींचे ट्विट

अनुराग कश्‍यप यांच्या मनमर्जियॉं चित्रपटातून अभिनेता अभिषेक बच्चन मोठ्या विश्रांतीनंतर कलाविश्वात पुनरागमन करतोय. नुकताच या चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये अभिषेक बच्चन, तापसी पन्नू आणि विकी कौशल यांना नव्या लूकमध्ये पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली आहे. खुद्द बिग बींनासुद्धा अभिषेकचा हा लूक आवडल्याचे दिसतेय. एवढेच नव्हे तर त्यांनी लेकाच्या फोटोवर ट्विटही केले आहे. अभिषेकचा आपल्या पूर्ण कुटुंबाला फारच अभिमान वाटत असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.

मनमर्जियॉंमध्ये अभिषेक पगडी धारी पंजाबी व्यक्तीच्या लूकमध्ये दिसत आहे. तर, तापसी आणि विकी यामध्ये एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या एका प्रेमी युगुलाच्या भूमिकेत दिसत आहेत. चित्रपटाची स्टारकास्ट पाहता चित्रपटातून प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळण्याचे अंदाज वर्तविले जात आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)