अभिषेक आणि ऐश्‍वर्याची नवीन अपार्टमेंट तयार

अभिषेक आणि ऐश्‍वर्याच्या लग्नाला आता 11 वर्षे होऊन गेली आहेत. त्यांची मुलगी अराध्या ही देखील आता 6 वर्षांची झाली आहे. “प्रतिक्षा’ बंगल्यामध्येच त्यांचा विवाह सोहळा झाला होता. सध्या अभिषेक आणि ऐश्‍वर्या जुहूमधील “जलसा’ बंगल्यात रहात आहेत. मात्र काही महिन्यांपूर्वीच अभिषेकने स्वतःसाठी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्‍सजवळ आलिशान अपार्टमेंट खरेदी केले होते. या फ्लॅटची खरेदी झाली तेंव्हा याची किंमत 21 कोटी रुपये होती. इतक्‍या महागड्या फ्लॅटचे इंटिरियरचे काम अजून पूर्ण झालेले नाही. म्हणूनच अभिषेक आणि ऐश अद्याप तिथे रहायला गेलेले नाहीत. जर हे दोघे तिथे रहायला गेले, तर सोनम कपूर त्यांच्या शेजारी असेल.

सोनमनेही याच लोकेशनमध्ये 7 हजार स्केअर फूटचा आलिशान फ्लॅट 35 कोटी रुपयांना खरेदी केल्याचे समजते आहे. या आलिशान फ्लॅटचे डिजाईन आणि बांधकाम तलाटी पांथकी असोसिएटसनी केले आहे. यांनीच अनुष्का – विराट, कंगणा रणावत आणि प्रियांका चोप्राच्या लग्झरीयस फ्लॅटचे डिजाईन केले होते. सध्या ऐश्‍वर्या राजकुमार राव आणि अनिल कपूर बरोबर “फन्ने खां’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे, तर अभिषेक बच्चन”मनमर्जिया’मध्ये व्यस्त आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)