अभिषेकलाही आवडते सलमान आणि ऐश्वर्याची जोडी 

मुंबई – अभिषेक बच्चन आज ४३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. अभिषेकने २००७ साली ऐश्वर्या रायसोबत विवाह केला होता. लग्नाच्या १२ वर्षांनंतरही ऐश्वर्या आणि अभिषेक आपले वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत. विवाहाआधी ऐश्वर्या आणि सलमान खानच्या अफेयरच्या बातम्या चांगल्याच व्हायरल झाल्या होत्या. तरीही अभिषेक आणि सलमान खानमध्ये कोणतेही वितुष्ट नाही. उलट अभिषेक बच्चनला सलमान आणि ऐश्वर्याची ऑनस्क्रीन जोडी अतिशय आवडते.

मनमर्जिया चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अभिषेक बच्चनने म्हंटले होते कि, मला ऐश्वर्या आणि सलमान खानचा ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट आवडतो. मी अनेक वेळा तो चित्रपट पहिला आहे, असे त्याने सांगितले होते.

दरम्यान, अभिषेक बच्चनने ‘रिफ्युजी’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटात अभिषेकचा अभिनय फारसा गाजला नाही. या चित्रपटात सहकलाकार करीना कपूरने रोमँटिक सीन्स द्यायला नकार दिला होता. अभिषेक माझ्या  भावासारखा असल्याने आपण या चित्रपटात  रोमँटिक सीन्स देऊ शकत नसल्याचं तिने दिग्दर्शक जे पी दत्ता यांना म्हटले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)