‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच जबाबदारीचे भान असावे’

पुणे – एक उत्तम नागरिक होण्यासाठी अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याबरोबरच जबाबदारीचे भान असणे देखील आवश्‍यक आहे. आयुष्य हे एक आव्हान आहे जिथे पदोपदी स्वतःला सिद्ध करून दाखवावे लागते आणि ह्यातून आपली सुटका नाही, असे मत केंद्रीय युवक व क्रीडा मंत्री कर्नल राजवर्धनसिंग राठोर यांनी व्यक्‍त केले आहे.

सिम्बायोसिस इंटरनॅशनल (अभिमत विद्यापीठ) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या फेस्टिवल थिंकर्सच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सिम्बायोसिसचे कुलपती डॉ. शां. ब. मुजूमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरु डॉ. रजनी गुप्ते, एसआयबीएमचे संचालक डॉ. आर. रमण आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रत्येकासाठी संधीची एक खिडकी उपलब्ध आहे. ती बंद होण्याआधी तिचा फायदा करून घ्यावा लागेल. ती मर्यादीत काळासाठीच खुली आहे. भारत ही जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते; परंतु आपण केवळ ग्राहक बनून स्वतःला प्रतिबंधित करू नये, तर जागतिक दर्जाच्या उत्पादनांची निर्मिती करून जागतिक बाजारातही योगदान दिले पाहिजे. मेक इन इंडिया या केंद्र सरकारद्वारा पुरस्कृत उपक्रमामुळे उद्योग जगतात विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे, असेही राठोर यांनी सांगितले.

जगात महान अशी ओळख असलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीचा कायम आदर करा व एक अमूल्य, अद्वितीय नागरिक होण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

भारताने ऑलिम्पिक गेम्सचे यजमान पद भूषवण्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, मोठ्या प्रमाणावर कोट्यवधी रुपये खर्च करून अशा स्वरूपाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यापेक्षा आपण आपल्या देशात पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी पैसा वापरायला हवा. आपल्या आयुष्यातील खेळाचे महत्त्व समजावून सांगताना ते पुढे म्हणाले की, शाळा किंवा कॉलेजच्या वर्गात आपण जे शिकू शकत नाही ते क्रीडांगणावर नक्‍कीच शिकू शकतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)