अभिवादन सभेव्दारे शहिदांना मानवंदना

पिंपरी – शहीद दिनानिमित्त पिंपळे गुरव येथील गुरुशोभा सामाजिक संस्थेच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.

शहीद भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना यावेळी मेणबत्ती प्रज्ज्वलित करुन आदरांजली वाहण्यात आली. माजी नगरसेविका शोभा आदियाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेस ऍड. वसंत कांबळे, प्रा. मुकेश पवार, तानाजी जवळकर, अमरसिंग आदियाल, नयन अहिरे, सुनील दिवाण, लक्ष्मी आदियाल, द्रोपदी रंधवे, दिपाकौर आदियाल, नितीन कदम, समशेर चौहान, सुशील चव्हाण, रमा कांबळे, अंजू नखाते, सुजाता निकाळजे, शाम जगताप, राजेंद्र जगताप, शिवलाल कांबळे, मुकेश पवार आदी उपस्थित होते.

यावेळी ऍड. कांबळे यांनी शहिदांच्या कर्तुत्वाला उजाळा दिला. प्रा. मुकेश पवार यांनीही यावेळी क्रांतीकारी लढ्यांची माहिती दिली. स्वागत अमरसिंग आदियाल यांनी केले. आभार तानाजी जवळकर यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)