अभियांत्रिकी महाविद्यालयात ग्रंथपाल दिवस साजरा

मांजरी – ग्रंथालय हे महाविद्यालयामध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून केंद्रबिंदू म्हणून सतत कार्य करत असते. अवांतर वाचनाच्या सवयीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञानामध्ये अधिक भर पडून वाचन संस्कृती वाढीस लागली आहे, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.व्ही.पाटील यांनी व्यक्त केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, मांजरी बु. मध्ये ग्रंथपाल दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर ग्रंथपाल दिवस म्हणून साजरा केला जातो. प्राचार्य आर.व्ही.पाटील यांच्या हस्ते एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. महाविद्यालयाचे ग्रंथपाल केतन डुंबरे यांनी ग्रंथपाल दिवसाचे महत्त्व पटवून सांगताना डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या कार्याला उजाळा दिला. याप्रसंगी डी.ओ.पाटील, एन.आर.जैन, आर.एम.साहु, एन.बी.भालेराव, ए.एस.देशपांडे, आर.के.मोजे, एस.एम.भडकुंभे, मदन वैद्य, शीला कुदळे, सुरेखा जाधव, अजित गुंड, संदिप टिळेकर, विकास ढवळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)