अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी साकारले टेक्‍नोलॉजिचे गणराय

पुणे  – ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील ऑटोमोबाईल इंजिनीअरिंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी टेक्‍नोलॉजिचा वापर करीत आगळावेगळा बाप्पा साकारला आहे. सलग 8 दिवस काम करीत खराब झालेल्या गाड्यांच्या पार्टस्पासून 4 फूटाची गणेश मूर्ती विद्यार्थ्यांनी तयार केली आहे.
ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सागर ढोले पाटील, सचिव उमा ढोले पाटील, प्रा. डॉ. अभिजीत दंडवते, विभागप्रमुख प्रा.सिद्धराज अल्लुरकर, प्रा.रत्नदीप भोरगे, प्रा.जगदीश बायस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संकेत कुबडे, कुणाल बागुल, ऋषीकेश शिंदे, निलेश पुणेकर, विनायक आघाव, चैतन्य लोंढे, चार्ल्सनायडू, प्रतीक प्रजापती या विद्यार्थ्यांनी हा गणपती साकारला आहे. मोटारसायकलची पेट्रोल टाकी, सायलेन्सर, हेडलाईट, इंडिकेटर, पिस्टन, कॉंनेकटिंग रॉड, स्पार्क प्लग आणि स्पेअर पार्टस्चा वापर विद्यार्थ्यांनी मूर्ती बनविण्यासाठी केला.
सागर ढोले पाटील म्हणाले, महाविद्यालयात दरवर्षी अतिशय उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कौशल्यांचा वापर करीत यंदा ऑटोमोबाईल गणेशाची मूर्ती तयार केली आहे. अभ्यासक्रमासोबतच विविध माध्यमातून परिपूर्ण विद्यार्थी घडावेत, यासाठी संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)