अभियंत्यांनी ग्रामीण भागात तंत्रज्ञानाबाबत जागरुकता वाढवावी

पुणे – अभियंता आणि प्रशासकीय अधिकारी यांचा जवळचा संबंध आहे. अभियंत्यांना तंत्र माहिती असते, तर अधिकाऱ्यांना लोकांचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य. अभियंत्याने तांत्रिक प्रश्न सामान्य भाषेत रूपांतरित करून सांगणे आवश्‍यक असून ग्रामीण भागात तंत्रज्ञानाबाबत जागरुकता वाढवणे गरजेचे आहे, असे मत पीएमआरडीएचे आयुक्‍त किरण गित्ते यांनी व्यक्‍त केले.

विकासकर्मी अभियंता मित्र, महानगरपालिका अभियंता संघ यांच्या संयुक्‍त विद्यमाने जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे व कमलाकांत वडेलकर यांच्या वाढदिवसानिमित्त व अभियंता मित्रच्या 32 व्या वर्धापनदिनानिमित्त गुणवंत अभियंते आणि त्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार सोहळा आयोजिला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संत साहित्याचे अभ्यासक श्रीपाल सबनीस, संस्कृत पंडित वसंतराव गाडगीळ, मुख्य अभियंता प्रवीण किडे, ठाणे शहर अभियंता अनिल पाटील, लक्ष्मण व्हटकर, कमलाकांत वडेलकर आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी भारतीय युद्धकथा पुस्तकाचे प्रकाशन झाले. गिते म्हणाले, अभियंत्याला एखाद्या विषयाचे खोलवर ज्ञान असते. त्यांनी आपल्या ज्ञानाचा वापर करुन सामाजिक कामात हातभार लावावा. पर्यावरणपूरक काम करण्यासह सामाजिक आर्थिक विकासाचे भान राखणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. सबनीस म्हणाले, राष्ट्र उभारणीत अभियंत्यांचे योगदान मोलाचे आहे. जातीधर्माच्या पलीकडे जाऊन हे अभियंते देशाच्या विकासात हातभार लावत असतात. काही लोक भ्रष्टाचारी असू शकतात. मात्र, त्यामुळे प्रामाणिक अभियंत्यांवर अन्याय होऊ नये. वसंत शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)