अभिनेत्री श्री रेड्डीचा क्रिकेटच्या ‘या’ महान व्यक्तीवर खळबळजनक आरोप 

काहीच दिवसांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेत्री श्री रेड्डीने टॉलिवूडमधील अनेक दिग्गज व्यक्तींवर आरोप लावले होते. याविरोधात हैद्राबादमध्ये फिल्म चेंबरसमोर टॉपलेस होत कास्टिंग काऊचला विरोधही केला होता. यामुळे तेलगू इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली होती. श्री रेड्डी हिने आता आणखी एक खळबळजनक आरोप केला आहे. यावेळेस तिने थेट क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नाव अभिनेत्री चार्मी कौर हिच्यासोबत जोडले आहे. यासंबंधी तिने एक फेसबुक पोस्ट केली आहे.

काय आहे फेसबुक पोस्ट – 
क्रिकेटचे देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर हैद्राबादमध्ये आले असताना एका चार्मिंग गर्लने त्याच्यासोबत रोमान्स केला. हाय प्रोफाइल चामुंडेश्वरी स्वामींनी यामध्ये मध्यस्थीची भूमिका केली. महान माणूस चांगलं खेळू शकतात. माझा अर्थ चांगला रोमान्स करू शकतात. या पोस्टचा संबंध अभिनेत्री चार्मी कौरशी असल्याचे मानले जात आहे. या पोस्टनंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. अनेकांनी तिच्यावर टीकासुद्धा केली आहे. आता यावर सचिन तेंडुलकर आणि चार्मी कौर काय प्रतिक्रिया देणार हे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, याआधीही तामिळ इंडस्ट्रीतील पवन कल्याणपासून अभिनेता नानी आणि प्रसिद्ध निर्माते सुरेश बाबू यांचा मुलगा अभिराम दग्गुबती याच्यावरही कास्टिंग काऊचचा आरोप श्री रेड्डीने केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)