अभिनेत्री मुमताजच्या निधनाचे अफवा

कित्येक सिनेतारकांच्या अकाली निधनाच्या अफवा यापूर्वी पसरल्या होत्या. अजूनही अशा अफवा पसरत असतात. यावेळी जुन्या जमान्यातील ऍक्‍ट्रेस मुमताज यांच्या निधनाची अफवा पसरली आहे. हृदयविकाराच्या झटक्‍याने मुमताज यांचे निधन झाले, अशी अफवा नुकतीच पसरली होती. मुमताज यांच्या फॅन्सना या बातमीमुळे धक्काच बसला होता. मात्र मुमताज यांच्या परिवाराने ही बाब म्हणजे अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.

मुमताज यांची धाकटी मुलगी तान्या माधवानी हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ टाकून मुमताज यांची तब्येत ठिक असल्याचे आणि सध्या आपल्याबरोबर रोममध्ये असल्याचे स्पष्ट केले आहे. मी आणि आई आता शॉपिंग करायला जाणार आहोत. या शॉपिंगचे फोटो मी लवकरच पोस्ट करेन, असे तान्याने म्हटले आहे. तिने आपल्याबरोबर मुमताज यांचे काही फोटोही पोस्ट केले आहेत. त्यात मुमताज अगदी फिट ऍन्ड फाईन दिसत आहेत.

रास्ते, अनपढ, बंधन, खिलौना, आणि मेला सारख्या सिनेमातून काम केलेल्या मुमताज यांनी 1974 साली मयूर वाधवानीबरोबर विवाह केला. त्यांनी 13 वर्षांची गॅप घेऊन 1990 मध्ये “आंधियां’मधून पुनरागमन केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)