अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विनयभंग

मराठी सिनेसृष्टीच्या अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासोबत विनयभंगाची घटना घडली. मुंबईतील मीरा रोडमधील चित्रपटगृहात शनिवारी हा प्रकार घडला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीने थिएटरमध्ये त्यांचा विनयभंग केल्याचं बेर्डे यांनी सांगितले.

मीरा रोडमधील थिएटरमध्ये हा प्रकार घडला. प्रिया बेर्डे आपल्या मुलीसह थिएटरमध्ये होत्या. सुरक्षरक्षकाच्या मदतीने आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी बोरीवलीतील 43 वर्षीय बिझनेसमन सुनीला जानीला शनिवारी अटक करण्यात आली आहे. काशीमिरा पोलिस्टेशनमध्ये आरोपीविरोधात भारतीय दंडविधान कलम 354 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

प्रिया यांच्या तक्रारीनुसार आरोपी आणि त्याच्यासोबत असलेले तीन जण मद्यधुंद अवस्थेत होते. संध्याकाळी 5.30 वाजताचा शो सुरु झाल्यानंतर आरोपींनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यानंतर थिएटरमधील इतर प्रेक्षकांनी त्यांना मज्जाव केला असता ते तिघेही थिएटरमधून बाहेर गेले. पण काही मिनिटांनी कोणीतरी आपल्या कमरेला स्पर्श करत असल्याचे जाणवलं. गोंधळ घालणारा व्यक्तीच हे कृत्य करत असल्याचे लक्षात आल्यानंतर मी त्याच्या थोबाडीत लगावली आणि आरडाओरडा केला. तो दारुच्या नशेत होता. मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु मला धक्का देऊन त्याने पळ काढला.

यानंतर आम्ही मॉलच्या सुरक्षारक्षाकडे जाऊन संबंधित आरोपीची माहिती दिली. त्याला मॉलबाहेर गाडीची वाट पाहत असलेल्या आरोपीला सुरक्षारक्षकांनी पाहिले. पण आम्हाला पाहिल्यानंतर तो मॉलच्या आत पळाला. मात्र दुसऱ्या मजल्यावर सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडलं. काशीमिरा पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. आरोपी पोलिस कोठडीत असून चौकशी सुरु असल्याची माहिती ठाणे शहरचे पोलिस अधीक्षक महेश पाटील यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)