अभिनेत्री डेझी इराणी यांची सहाव्या वर्षी बलात्कार झाल्याची कबूली

मुंबई : अभिनेत्री डेझी इराणी  या सहा वर्षांच्या असताना त्यांच्यावर बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हि माहिती खुद्द डेझी यांनी दिली आहे. ‘हम पंछी है एक डाल के’ या चित्रपटाचे शुटिंग सुरु असताना त्यांच्यावर बलात्कार झाला. त्यांचे कौटुंबिक संबंध असलेल्या एका व्यक्तीने तत्कालिन मद्रासमध्ये हे कृत्य केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

छोट्या आणि मोठ्या पडद्यावर खूप बाल कलाकार दिसतात. त्यांच्या टॅलेंटला वावही मिळत आहे. पण त्यांच्या सुरक्षेची काळजी त्यांच्या आप्तस्वकियांनी, आई-वडिलांनी नीट घ्यावी, हे सुचवण्यासाठी त्यांनी आपली आपबिती जगासमोर उघड केली. मुंबईतील एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या घटनेचे कथन केली.

तो माणूस आता जिवंत नाही, तो गेला. त्याचे नाव नझीर होते. सुप्रसिद्ध गायिका जोहराबाई अंबालेवाली यांचा तो नातेवाईक होता. त्यामुळे साहजिकच त्याचे फिल्म जगतात उत्तम संबंध होते. माझ्या आईला कोणत्याही परिस्थितीत मला फिल्मस्टार झालेले पाहायचे होते. मी ‘बेबी’ या मराठी सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

नझीर काका त्यावेळी मद्रासमध्ये सुरु असलेल्या ‘हम पंछी एक डाल के’ या सिनेमाच्या शूटिंगसाठी माझ्यासोबत आला होता. मला तो अख्खा प्रसंग तुकड्या तुकड्यांत आठवतो. पण ती जीवघेणी वेदना अजूनही माझ्या जशीच्या तशी आठवणीत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी जसे काही झालेच नाही, अशा भावात पुन्हा स्टुडिओत आले. नझीरने काय केलं, हे आईला सांगण्याची हिंमत मला बरीच वर्ष झाली नाही, असे डेझी यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)