अभिनेत्री झीनत अमान यांची बिझनेसमनविरोधात विनयभंगाची तक्रार

ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी सरफराज बिझनेसमनवर विनयभंग आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे. झीनत अमान यांच्या तक्रारीनंतर जुहू पोलिसांनी सरफराज उर्फ अमन खन्ना नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. 68 वर्षीय झीनत अमान यांच्या आरोपानुसार, 27 जानेवारी रोजी सरफराजने बिल्डिंगखाली येऊन मला धमकावले.

तसेच सुरक्षारक्षकाशी गैरवर्तन करुन त्याला मारहाणही केली. आरोपी सरफराज काही दिवसांपासून माझा पाठलाग करत होता. तसेच व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेजही पाठवत असल्याचे झीनत अमान यांनी सांगितले. पोलिसांनी सरफराजविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सरफराज सध्या फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)