अभिनेत्री झीनत अमान यांचा उद्योगपतीवर बलात्काराचा आरोप

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी उद्योगपती अमन खन्ना याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. जुहू पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला असून खन्नाला अटक करण्यात आली आहे. झीनत अमान यांनी दोन महिन्यांपूर्वी अमन खन्नाविरोधात पाठलाग केल्याचा आणि धमकावल्याचा आरोप केला होता. झीनत यांनी ३० जानेवारी रोजी खन्नाविरोधात तशी तक्रारही नोंदवली होती. पोलिसांनी तेव्हा खन्नाला अटकही केली होती.

झीनत यांना अश्लिल मेसेज पाठवल्याचा आरोपही खन्नावर ठेवण्यात आलेला आहे. जबरदस्ती घरात घुसने, धमकावणे आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण करणे आदी आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आलेले आहेत. खन्ना आणि झीनत हे एकमेकांना ओळखत असून त्यांच्यात काही आर्थिक व्यवहार सुरू होते. परंतु त्यात नुकसान होत असल्याचा अंदाज येताच झीनत यांनी हा व्यवहार रद्द केला. त्यानंतर त्याने मला धमकी देण्याचे सत्र सुरू केल्याचा आरोपही झीनत यांनी केला होता. त्याच्याविरोधात बांगूर नगर पोलीस ठाण्यातही अनेक गुन्हे दाखल आहेत. सिनेनिर्मिती आणि रिअल इस्टेटचा त्याचा व्यवसाय असल्याचे सांगण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)