अभिनेत्री झीनत अमानवर बलात्कार…

मुंबईतील व्यावसायिकाला अटक
मुंबई – बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान हिने मुंबईतील एका व्यावसायिकाने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला असून तिने दाखल केलेल्या तक्रारीनुसार जुहू पोलिसांनी काल रात्रीच मोहंमद सरफराज नावाच्या इसमाला अटक केली आहे. या 68 वर्षीय अभिनेत्रीचा या इसमाने यापूर्वीही पाठलाग व विनयभंग केल्याचा आरोप असून त्या प्रकरणातही झीनत अमान हिने गेल्या 30 जानेवारीला जुहू पोलिसांकडे तक्रार केली होती त्यावेळीही त्याला अटक करण्यात आली होती.

आता त्यांनी थेट त्याच्यावर बलात्काराचाच गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रॅंचकडे सोपवण्यात आला आहे. या व्यावसायिकाने आपली 15 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचीही तिची तक्रार आहे. पोलीस या तक्रारीविषयी शहानिशा करीत आहेत. हा इसम आपल्याला व्हॉट्‌सअपवरून अश्‍लील संदेश पाठवत होता आणि नंतर त्याने आपल्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करून आपल्यावर बळजबरी केली अशी तिची तक्रार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup: Thumbs up
5 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
2 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)