अभिनेत्री जयंती यांच्या निधनाची बातमी अफवा; कुटुंबीयांकडून स्पष्टीकरण

कन्नडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जयंती यांच्या निधनाची बातमी ही अफवा आहे, याचे स्पष्टीकरण कुटुंबीयांनी दिले आहे. श्वसनाचा त्रास सुरु झाल्यानंतर जयंती यांना बंगळुरुतील एका खासगी रुग्णालयात करण्यात आले होते, जिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असा दावा काही वृत्तांमध्ये करण्यात आला. मात्र हा दावा कुटुंबीयांनी खोडून काढला आहे.

जयंती यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचेही बोलले जात होते. मात्र हे सर्व वृत्त कुटुंबीयांना फेटाळले आहेत. शिवाय ही अफवा नेमकी कशी पसरली याबाबत आपण चिंतेत आहोत, असंही कुटुंबीयांनी म्हटलं आहे. जयंती यांच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांना धक्काच बसला होता. चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजलीही वाहिली. मात्र सध्या जयंतीच्या यांच्यावर उपचार सुरु असून त्या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती आहे.

जंयती क्रोनिक या गेल्या तीन दशकांपासून दम्याच्या आजाराने त्रस्त आहेत. रविवारी त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी आपल्या कारकीर्दीत 500 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)