अभिनेत्री अमिता अद्गाता यांचे निधन

छोट्या पडद्यावरील विविध मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता यांचे मंगळवारी निधन झाले. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. अमिता यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. पण, फुफ्फुसे निकामी झाल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.

अद्गाता यांनी आजवर बऱ्याच मालिकांतून उल्लेखनीय भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली होती. १९६५-६६ मध्ये त्यांनी रंगभूमीवर काम करत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.  अमिता यांनी १९७९ चे ९० पर्यंत दिल्ली दुरदर्शनशीही जोडल्या गेल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात एक पोकळी निर्माण झाली असून, अनेक कलाकारांना धक्काच बसला आहे. अमिता यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांवरील मायेचे छत्र हरपल्याचे म्हणत टेलिव्हिजन सेलिब्रिटींनी दु:ख व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)