अभिनेत्री अचिंत कौरने शेअर केले बोल्ड फोटो

टीव्ही मालिका ‘जमाई राजा’  यामध्ये सासूची भूमिका साकारणारी अभिनेत्री सध्या चर्चेत आहे. आणि त्याला कारण देखील तसंच काहीस आहे अभिनेत्री अचिंत कौरने पुन्हा एकदा आपला बोल्ड अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या आताच्या फोटोत तिने लांब गळ्याचा आणि हाय लिस्ट गाऊनमध्ये दिसत आहे. तिचा हा अवतार बघून सोशल मीडियावर भरपूर चर्चा होत आहे.

काहींनी तिची तुलना पुरूषांशी केली आहे. तर काहींना अंचित कौरचा बोल्ड अंदाज अधिक भावला आहे. तिच्या या सौंदर्याच भरभरून कौतुक केले आहे. त्यांच्या चाहत्यांनी सुंदर, बहादूर आणि सेक्सी, बोल्ड अशा कमेंट केल्या आहेत.अचिंत कौर बऱ्याचदा साडी आणि गाऊनमध्ये आपले फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. अचिंतने मॉडेलिंगमधून आपल्या करिअरला सुरूवात केली आहे. टीव्हीमध्ये 1994 मध्ये बनेगी अपनी बात या मालिकेतून अभिनयाला सुरूवात केली. तसेच ओम जय जगदीश, कॉर्पोरेट आणि जूली या सिनेमांत देखील पाहायला मिळाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)