अभिनेत्री अंजली श्रीवास्तवच्या मृत्यू प्रकरणी ट्विस्ट

मुंबई : नवोदित भोजपुरी अभिनेत्री अंजली श्रीवास्तवच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्‍यता आहे. पोलिसांनी आत्महत्येची केस दाखल केली असली, तरी अंजलीच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त करत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अंजलीची आई सोमवारी रात्री उत्तर प्रदेशहून मुंबईत दाखल झाली. त्यावेळी तिने डी.एन.नगर पोलिसांकडे अंजलीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. फोनवर शेवटचे बोलणे झाले, त्यावेळी ती खुश तर होतीच, पण पुढच्या महिन्यात होणारे नातेवाईकाचे लग्न आणि वाढदिवसाच्या तयारीला लागली होती. त्यामुळे 24 तासांत ती आत्महत्या कशी करेल, असा प्रश्न तिच्या आईने उपस्थित केला. उसके साथ जीने का एक मौका दे दे ऐ खुदा, तेरे साथ तो हम मरने के बाद भी रह लेंगे | 8 जूनला फेसबुकवर लिहिलेली अंजलीची ही शेवटची पोस्ट. यातच अंजलीच्या मृत्यूचे गूढ पोलिस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)