अभिनेते कमल हसन यांनी केले रजनीकांत यांचे स्वागत

चेन्नई -दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत यांच्या  राजकारणातील प्रवेशाबाबत अनेक तर्क -वितर्क लढवले जात होते. अखेर आज रजनीकांतनी सर्व शक्यतांना पूर्णविराम देत राजकारणात प्रवेश केला.

चेन्नईतील श्री राघवेंद्र मंडपम् सभागृहात चाहत्यांना संबोधित करत त्यांनी ही घोषणा केली. येत्या काळात आपण नव्या पक्षाची स्थापना करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. चित्रपटसृष्टीतील यशस्वी कारकिर्दीनंतर रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल अभिनेते कमल हसन यांनी त्यांचे अभिनंदन केले.

-Ads-

‘रजनीकांत यांनी आपली समाजाप्रती असणारी जबाबदारी समजून घेत राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि राजकीय पटलावर त्यांचे स्वागत करतो’, असे ते म्हणाले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)