पुणे,दि.4-दहीहंडी उत्सव साजरा करताना ध्वनिप्रदुषण आणी वाहतूकीला अडथळा आणल्याप्रकरणी शहरातील चार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये सहकारनगर पोलीस ठाण्यात मराठी अभिनेता संतोष जुवेकरवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दहीहंडी मंडळाचा स्टेज पडल्याने पाच जण जखमी झाल्याची घटना बुधवार पेठ येथे घडली. याप्रकरणीही मंडळाच्या अध्यक्षासह चौघांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बुधवार पेठेतील विजय शिवाजी तरुण मंडळ येथे दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यासाठी स्टेज उभारण्यात आले होते. हे स्टेज रात्री पावणे दहाच्या सुमारास कोसळले. यावेळी स्टेजवर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला पारितोषीक घेण्यासाठी बोलावण्यात आले होते. स्टेजवर प्रमाणापेक्षा जास्त गर्दी झाल्याने स्टेज मधोमध दबले जाऊन कोसळले. यामध्ये पाच नागरिक किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती फरासखाना पोलिसांनी दिली. याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष साईनाथ माने, उपाध्यक्ष शंकर भोसले, कार्याध्यक्ष नवनाथ परदेशी आणी स्टेज उभारणारा ठेकदार दत्तात्रय हेलकरी याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के यांनी दिली.
दहीहंडी उत्सव साजरा करताना ध्वनी प्रदुषण आणी वाहतूकीला अडथळा आणल्याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यातही एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरण्येश्‍वर दहीहंडी उत्सव मंडळाचे अध्यक्ष, स्टेज मालक, साऊंड मालक व अभिनेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरण्येश्‍वर मंडळाच्या अध्यक्षाने कार्यक्रम बंद करण्यास विरोध केल्याने शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. मंडळाचे अध्यक्ष सिध्दांत प्रधान, स्टेज मालक राजीवसिंग ठाकूर , साऊंड मालक विजय नरुटे आणी अभिनेता संतोष जुवेकर याच्याविरुध्द सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)