अभिनेता मोहितला येतेय ‘या’ गोष्टीची तीव्र आठवण…

दिवसेंदिवस उकाडा वाढत असून यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी प्रत्येकजणच विविध उपाय करत आहे. अभिनेता मोहित मलिकला ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मालिकेतील भूमिकेसाठी विविध ठिकाणी जावे लागते. या भटकंतीत तो फळांचे थंडगार रस पिण्याची मजा घेतोय. मात्र तरीही त्याला त्याची आई जी लस्सी करून देत असे, त्याची फार आठवण येत आहे.

यंदा उन्हाळ्याला लवकरच सुरुवात झाली असून हा उकाडाही खूपच जास्त आहे. ”मी कालच माझ्या आईशी बोलत होतो. तेव्हा मी तिला सांगितले की, मला तिच्या हातच्या जेवणाची आणि लस्सीची फार आठवण येतेय.” ती इथे राहत असती, तर फार बरे झाले असते, असे मोहित म्हणाला. मोहित आपल्या पत्नीसह मुंबईत राहतो तर त्याची आई दिल्लीत असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)