अभिनेता मोहनलाल यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

नवी दिल्ली – मल्याळम चित्रसृष्टीतील नामवंत अभिनेते मोहनलाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आपण जे सामाजिक कार्य सुरू केले आहे त्याची माहिती पंतप्रधानांना देण्यासाठी आपण त्यांची भेट घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या भेटीने आपल्याला आनंद झाला. त्यांनी हाती घेतलेले काम कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर अकौंटवर म्हटले आहे.

मोहनलाल यांनी सामाजिक कार्यासाठी विश्‍वशांती फाऊंडेशन नावाची संस्था स्थापन केली असून त्या संस्थे मार्फत त्यांनी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. आपण पंतप्रधानांना या कामाची माहिती दिल्यानंतर त्यांनी या कार्यात पुर्ण सहकार्य देण्याची घोषणा केली आहे असे त्यांनी नमूद केले. देशातील गरीबांसाठी त्यांनी आपल्या फाऊंडेशन तर्फे कर्करोग उपचार केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)