अभिनेता प्रकाश राज लवकरच निवडणुकीच्या आखाड्यात 

नवी दिल्ली – बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी नववर्षाच्या निमित्ताने एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. प्रकाश राज आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकारणाच्या आखाड्यात उतरणार आहेत. यासंबंधीची माहिती त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून दिली. शिवाय कोणत्याही पक्षाकडून निवडणुक लढणार नसून अपक्ष उभे राहणार आहेत.

प्रकाश राज यांनी म्हंटले कि, सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. एक नवीन सुरुवात आणि जास्त जबाबदारी. तुमच्या पाठिंब्याने मी आगामी लोकसभा निवडणुक अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार आहे. मतदार संघासंदर्भात लवकरच माहिती शेअर करेल. अब कि बार जनता कि सरकार, असा नारा प्रकाश राज यांनी ट्विटरवरून दिला आहे. प्रकाश राज यांनी याआधी अनेक वेळा पंतप्रधान नरेंद्र  मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर कडाडून टीका केली होती.

दरम्यान, प्रकाश राज यांच्याआधी कमल हसन आणि रजनीकांत यांनीही राजकारणात प्रवेश केला असून आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)