अभिनेता अर्जुन रामपालदेखील पत्नीपासून होणार विभक्त

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपाल 20 वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेत आहे. अर्जुन आणि मेहर जेसिया यांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अर्जुन रामपाल आणि मेहर जेसिया यांनी एकत्रितपणे स्टेटमेंट काढून घटस्फोटाचा निर्णय जाहीर केला आहे.

‘प्रेम आणि सुंदर आठवणींनी भरलेल्या 20 वर्षांच्या सुरेख प्रवासानंतर, आम्हाला सांगावंसे वाटते की, आता या प्रवासाच्या दिशा वेगवेगळ्या आहेत. दोघांनी वेगवेगळ्या दिशांना जाण्याची हीच योग्य वेळ आहे, असं आम्हाला वाटतं. नव्या प्रवासाला सुरुवात करतानाच, आम्ही एकमेकांसाठी आणि आमच्या प्रियजनांसाठी कायम सोबत असू, हे सांगू इच्छितो. नातं संपू शकतं, पण प्रेम नाही.’ असे अर्जुन-मेहर यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अर्जुन आणि मेहर यांनी 1998 मध्ये लगीनगाठ बांधली होती. त्यावेळी दोघंही जण मॉडेलिंग करत होते. त्यांना 16 वर्षांची महिका आणि 13 वर्षांची मायरा या दोन मुली आहेत. काही वर्षांपासून अर्जुन आणि मेहर यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा होत्या, मात्र त्यावेळी दोघांनीही हे आरोप फेटाळले होते. हृतिक रोशनची विभक्त पत्नी सुझान खानसोबत अर्जुनचं नाव जोडलं जात होतंं, मात्र अखेर चर्चांचा धुरळा खाली बसला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)