अभिनेता अनिकेत केळकरचा राजकारणात प्रवेश !

गेल्या पाच सहा वर्षापासून “लक्ष्य” या मालिकेतून आपल्या समोर पोलिस इन्स्पेक्टर म्हणून येणारा अभिनेता म्हणजे अनिकेत केळकर. “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे कर्तव्य मालिकेत अगदी चोख पार पाडणारा अनिकेत केळकर आता राजकारणात प्रवेश करत आहे. काय मंडळी घाबरलात ना? अहो अखिल देसाई दिग्दर्शित “मोर्चा” या मराठी सिनेमात अनिकेत राजकीय पुढारी साकारतो आहे. हा सिनेमा २३ मार्चला आपल्या सर्वत्र आपल्या भेटीला येत आहे. चला तर मग बघूया या सिनेमामध्ये अनिकेत केळकर याची नेमकी कोणती भूमिका आहे.

“मोर्चा” हा सिनेमा आपल्या समाजव्यवस्थेवर भाष्य करणारा सिनेमा आहे. “मोर्चा” या सिनेमामध्ये अनिकेत केळकर आपल्याला एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. यात अनिकेत मेहुल घोडके या राजकीय नेत्याची भूमिकेत साकारत असून, हा मेहुल घोडके आजच्या राजकारणातील व्यक्तीचे प्रतिनिधित्व करतो. राजकीय नेत्याची भूमिका साकारण्याची ही अनिकेत केळकर यांची पहिलीच वेळ आहे.

अनिकेत केळकर या सिनेमाबद्दल सांगतो की, राजकीय नेते जे निवडून आले होते त्यांनी काय केलं? आणि जे निवडून आले आहेत ते काय करत आहेत आणि पुढे जे निवडून येणार आहेत त्यांनी काय केलं पाहिजे या सर्व गोष्टींवर भाष्य करणारा “मोर्चा” हा सिनेमा आहे. माझ्यासोबत सिनेमात संजय खापरे, कमलेश सावंत, दिगंबर नाईक, दुष्यंत वाघ, उदय सबनीस, किशोर चौगुले, गौरी कदम, अंशुमन विचारे, आरती सोळंकी, संदीप गायकवाड, संदीप जुवटकर, संजय पाटील आणि प्रिया यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)