अभिनेता अक्षय खन्नाचा आज वाढदिवस

अभिनेता अक्षय खन्ना याचा आज वाढदिवस आहे. अक्षय खन्नाचा पहिला चित्रपट ‘हिमालय पुत्र’ पूर्णपणे फ्लॉप झाला होता. अक्षयचे पिता विनोद खन्ना हेच त्याच्या या चित्रपटाचे निर्माते होते. मात्र, अक्षयने लहानपणापासूनच एक गोष्ट पक्की ठरवली होती. ती म्हणजे, त्याला आयुष्यात अभिनेताचं व्हायचेय. त्यामुळेच त्याने वयाच्या 18 व्या वर्षीची अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले.

‘हिमालय पुत्र’ या एका फ्लॉपनंतर अक्षय ‘बॉर्डर’ चित्रपटमध्ये दिसला. अक्षयचा हा दुसरा चित्रपट मात्र कमालीचा हिट झाला. या चित्रपटात अक्षयसोबत सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ असे अनेक दिग्गज स्टार होते. पण, अक्षय खन्नाचे काम सगळ्यांच्याच डोळ्यात भरले. यानंतर’मोहब्बत’,’कुदरत’,’लावारिस’,’हमराज’,’हंगामा’,’मॉम’ अशा अनेक चित्रपटात अक्षय झळकला. 1999 मध्ये ऐश्वर्या रायसोबतच्या ‘आ अब लौट चले’ या चित्रपटातील ऐश्वर्या व अक्षयची जोडी खूपच हिट झाली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)