अभिनयात ‘हिरो’ पण, सामान्य ज्ञानात मात्र ‘झिरो’च…

टायगर श्रॉफ अभिनयाच्या बाबतीत हिरो असला तरी सामान्य ज्ञानात मात्र झिरोच असल्याचे दिसून आले आहे. टायगरने एका मुलाखतीत प्रणव मुखर्जी हे देशाचे राष्ट्रपती असल्याचे सांगितले. त्याचे या उत्तरामुळे हसे झाले.

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे दोघे त्यांचा आगामी चित्रपट बागी-2च्या प्रमोशनसाठी गेले होते. तिथे टायगरला देशाचे राष्ट्रपती कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर टायगर म्हणाला हा फारच कठीण प्रश्न आहे. यानंतर काही वेळ विचार करुन त्याने मिस्टर मुखर्जी हे देशाचे राष्ट्रपती आहेत, असे उत्तर दिले. त्याच्या या उत्तरानंतर तेथील उपस्थितांसह अभिनेत्री दिशा पटानी हिला देखील हसू आवरले नाही. हाच प्रश्न दिशालाही विचारण्यात आला. यावर तिने रामनाथ कोविंद असे बरोबर उत्तर दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)