अभाविपने दिल्ली विद्यापिठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षाला हटवले 

नवी दिल्ली – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिल्ली विद्यापिठ विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष अन्किव बैसोया याला पदावरून हटवले आहे. बैसोया याने मिळवलेली पदवी बनावट असल्याच्या आरोपातून ही कारवाई करण्यात आली आहे. या आरोपांची चौकशी पूर्ण होईपर्यंत बैसोया याला विद्यार्थी संघटनेच्या कार्यकारिणीवरूनही निलंबित करण्यात आले आहे.

बैसोया याने तामिळनाडून मिळवलेल्या पदवीची सत्यता दिल्ली विद्यापिठाने 20 नोव्हेंबरपर्यंत पडताळून पहावी, अशी सूचना दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी दिली होती. दोनच महिन्यांपूर्वी दिल्ली विद्यापिठातील विद्यार्थी संघटनेची निवडणूक झाली होती. बैसोयाच्या पदवी प्रकरणामुळे लगेचच फेरनिवडणूका होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. अभाविपने ही कारवाई दबावापोटी केल्याची टीका “एनएसयुआय’ या कॉंग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेकडून करण्यात आली आहे. मात्र विद्यार्थी संघटनेच्या सत्यतेसाठीच ही कारवाई केली गेली असल्याचे अभाविपने म्हटले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)