अभाविपचे विद्यापीठात उपोषण

 

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रातील दुरावस्थेविरोधात आंदोलन करणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध विद्यापीठ प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे मागे घ्यावेत आणि आरोग्य केंद्रातील दुरवस्था दूर कराव्यात, या मागण्यांसाठी “अभाविप’कडून मंगळवारपासून उपोषण सुरू करण्यात आले.

-Ads-

विद्यापीठाच्या आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. शशिकांत दुधगावकर यांनी “अभाविप’ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. याविरोधात “अभाविप’चे श्रीराम कंधारे, विनायक राजगुरू, हनमंत रंगा, ऐश्वर्या भणग, शशिकांत टिंगरे, सचिन लांबुरे, प्रियंका रणदिवे या विद्यार्थ्यांनी आजपासून उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी मंगळवारी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र जोपर्यंत विद्यार्थ्यांवरील खोटे गुन्हे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत प्रशासनाशी कोणतीही चर्चा केली जाणार नाही, अशी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भूमिका असल्याचे “अभाविप’चे पुणे विद्यापीठ अध्यक्ष श्रीराम कंधारे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)