“अभय’तून 21 कोटींचा मिळकत कर जमा

पिंपरी – महापालिकेच्या कर संकलन विभागाकडे अभय योजनेअंतर्गत 15 ऑक्‍टोबर अखेर 21 कोटी 37 लाख रुपयांचा कर जमा झाला असून 5 हजार 213 मिळकत धारकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

महापालिकेच्या वतीने मिळकतधारकांना अभय योजनेमध्ये 31 ऑक्‍टोबरपर्यंत कर व थकीत कर भरल्यास शास्ती करात 90 टक्के सुट देण्यात आली होती. त्यानुसार 21.37 कोटी रुपयांची वसुली महापालिकेने केली असून 90 टक्के शास्ती करातील सुट यानुसार 5.47 कोटी रुपयांची सवलत मिळकत धारकांना देण्यात आली आहे. कर धारकांनी वेळेत कर भरावे यासाठी महापालिका दरवर्षी अभय योजना राबवते. यावर्षीही 1 ऑक्‍टोबर ते 15 ऑक्‍टोबर या काळात एक रकमी कर भरणा करणाऱ्या मिळकत धारकास शास्ती कराच्या रकमेत 90 टक्के सुट दिली जाणार आहे. तर 16 ऑक्‍टोबर ते 31 ऑक्‍टोबर या कालावधीत कर भरणाऱ्या मिळकत धारकांना शास्तीच्या रकमेत 75 टक्के सुट दिली जाणार आहे. तसेच ऑनलाईन मिळकतकर भरणा करणाऱ्यांना सामान्य करात 2 टक्के सुट दिली जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या आर्थिक वर्षात महगापालिकेने 75 व 50 टक्के अशी सुट जाहीर केली होती. त्यानुसार 10 हजार 970 मिळकत धारकांनी 18 कोटी 14 लाख रुपयांचा कर भरला आहे. त्यावेळी 79 कोटी 60 लाख रुपयांची सवलत रक्कम देण्यात आली होती. यंदा मिळकत धारकांनी महापालिकेच्या योजनेला चांगला प्रतिसाद दिला असून 31 ऑक्‍टोबर पर्तंय कर भरून सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे. मिळकत धारकांना कर भरण्यासाठी करसंकलन विभागीय कार्यालये ही सकाळी नऊ ते चार या वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहे. या शिवाय महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन कर भरणा करता येणार आहे. तसेच रोख रक्कम, धनादेश व डिमांड ड्राफ्ट याच्याद्वारेही कर भरता येणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)