“अब तक छप्पन’लाख

जप्त केलेल्या बनावट नोटा:बाजारात आणखी नोटा असण्याची धास्ती
मयूर सोनावणे
सातारा, दि. 14 – देशभरात बनावट नोटांची अनेक प्रकरणे असून याचा त्रास सातारा जिल्ह्यातील नागरिकांनाही झालेला आहेच. बनावट नोटांची प्रकरणे सातारकरांसाठी नवीन नसली तरी आता या बनावट नोटांची साताऱ्यातच छापाई होत असल्याचा प्रकार जिल्ह्याला नवीन असल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात “अब तक छप्पन’ लाख बनावट नोटा छापल्याचे उघड झाले असले तरी नागरिकांना धास्ती आहे ती बाजारपेठेत यातील नोटा पसरल्या आहेत की नाहीत याची.
गेल्या काही वर्षामध्ये बनावट नोटाप्रकरणाची अनेक प्रकरणे उघडकीस आली. याची झळ नोकरदार वर्गासह सर्वसामान्य जनतेलाही सोसावी लागली आहे. मात्र, मोदी सरकारने देशाचा कारभार हाती घेतल्यानंतर जुन्या नोटांवर बंदी घालत नवीन चलन आणले. त्यामुळे या प्रकारांना आता आळा बसेल असा सर्वांनाच आशावाद होता मात्र तो पुरता फोल ठरला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा बनावट नोटा बनविण्याचे प्रकार सुरु झाले. देशातील मोठमोठ्या शहरात सुरु असलेल्या या प्रकाराचे हात-पाय सातारासारख्या छोट्या शहरांमध्ये पसरल्याचे गेल्या दोन दिवसांमधील उघड झालेल्या घटनांनी स्पष्ट झाले आहे.
आजपर्यंत कधीही साताऱ्यात बनावट नोटा छापण्याचे प्रकरण उघडकीस आले नसून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट नोटा छापण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईमुळे नागरिकांना समाधान दिले असले तरी बनावट नोटा प्रकरणाचा इथेच अंत झाला आहे की उदय याची धास्ती मात्र पोलिसांनाही कायम आहे.
चौकट
शक्‍यता नाकारता येत नाही?
साताऱ्या मोठ्या प्रमाणात बनावट नोटा सापडल्या असून या नोटा बाहेरुन कुठून आलेल्या नाहीत तर त्या प्रत्यक्ष साताऱ्यातच छापल्या गेलेल्या आहेत. याप्रकरणातील सहा आरोपींना अटकही करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यात बनावट नोटा छापणारे फक्त हे सहाजण होत का? असा प्रश्‍न उपस्थित होत असून आणखी काही अशी प्रकरणी उघडकीस येण्याची शक्‍यताही नाकारता येत नसल्याचे पोलिस सूत्रांकडूनच सांगितले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)