अब्दुल्ला सुलतान अहमद शाह मलेशियाचे नवीन राजे 

क्रीडारसिक राजाची मुदत 31 जानेवारीपासून 5 वर्षे

कुआलालांपूर – मलेशियाच्या राजघराण्याने सुलतान अब्दुल्ला सुलतान अहमद शाह यांची देशाचे भावी सुलतान म्हणून निवड केली आहे. सुलतान मोहंम्मद व्ही. यांनी नुकतेच राजेपदाचा त्याग केला होता. त्यांनी वैद्यकीय कारणासाठी घेतलेल्या रजेच्या काळातच “मिस मॉस्को’ या सौंदर्यस्पर्धेतील विजेत्या सुंदरीबरोबर विवाह केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. राजांनी पदत्याग केल्याची घटना मुस्लिम बहुल मलेशियाच्या इतिहासामध्ये प्रथमच घडली आहे. त्यामुळे त्याबाबत एक मोठा धक्का बसला होता.

सुलतान अब्दुल्ला सुलतान अहमद शाह हे मलेशियातील क्रीडारसिक आहेत. जागतिक फुटबॉल संघटना असलेल्या “फिफा’ सह प्रमुख क्रीडा संघटनांवर ते कार्यरत आहेत. सुलतान अब्दुल्ला यांना पोलो खेळामध्ये विशेष रुची आहे. ब्रिटनमध्ये त्यांनी मिलिटरी ऍकेडमीमध्ये शिक्षण घेतले आहे. मलेशियाच्या इस्लामिक राजघराण्याच्या विशेष बैठकीमध्ये त्यांची राजेपदी निवड करण्यात आली. सुलतान अब्दुल्ला यांची 16 वे “यांग दी परतुआन अगोंग'(राजे) म्हणून 5 वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ 31 जानेवारी 2019 पासून सुरु होणार आहे, असे अधिकृत प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मलेशियामध्ये घटनात्मक राजेशाही आहे. राजांची निवड दर 5 वर्षांनी केली जाते. देशातील 9 राज्यांमधून राजाची निवड केली जात असते. पूर्वी राजेपद मिळालेल्या 8 राजांच्या बैठकीत नवीन राजांच्या निवडीचा निर्णय घेण्यात आला. आता राजेपद मिळण्याची संधी पेहांग प्रांताला होती. त्यामुळे तेथील भावी राजे असलेल्या अब्दुल्ला यांचे नाव राजेपदासाठी सर्वाधिक चर्चिले जात होते. पेहांग प्रांताच्या राजेपदी अब्दुल्ला यांचे वडील आहेत. मात्र ते आजारी असल्याने अब्दुल्ला यांनी अलिकडेच प्रांताचे राजेपद स्वीकारले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)