अब्जावधी रूपयांची थंडावलेली कामे आम्ही पुर्ण केली : पंतप्रधानांचा दावा 

इम्फाळ – आमचे सरकार सत्तेवर आल्यापासून आम्ही आत्तापर्यंत सुमारे बारा लाख कोटी रूपयांची थंडावलेली कामे मार्गी लाऊन ती पुर्ण केली असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. येथील एका जाहींर सभेत बोलताना ते म्हणाले की मागच्या सरकारमध्ये काम करण्याची इच्छा नव्हती पण आम्ही सरकारमध्ये वर्क कल्चर निर्माण केले. सरकारी कामांना होणाऱ्या दिरंगाईमुळे एखादे शंभर कोटी रूपयांच्या कामाची किंमत दोनशे किंवा अडीचशे कोटी रूपयांवर जात असे आम्ही तो प्रकार बंद केला.

यासाठी आम्ही पंतप्रधानांच्या कार्यालयात प्रगती नावाची एक सिस्टीम विकसित केली. त्यात प्रामुख्याने खोळंबून राहिलेली कामे प्राधान्याने आम्ही हाती घेतली आणि ती कालबद्धपणे पुर्ण केली अशी माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे अटके-लटके-भटके असा प्रकार थांबला असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी यावेळी राज्यातील आठ विकास कामांचे उद्‌घाटन केले. या आधी केवळ निवडणुका जिंकण्यासाठी विकासकांमाची उद्‌घाटने केली जात असत. पण आम्ही तसे प्रकार करत नाही असेही मोदी यांनी नमूद केले. आधीच्या सरकारने मणिपुरला विकासापासून दूर ठेवले. 30 ते 40 वर्षे या राज्याच्या विकासाकडे लक्षच दिले गेले नाही असे ते म्हणाले. ईशान्य भारतातील सर्व राज्यांच्या राजधान्य रेल्वेसेवेने जोडण्याचा आमच्या सरकारचा संकल्प आहे असेही मोदी यांनी यावेळी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)