अब्जाधिशाचं एकाकीपण

आयुष्यात येणाऱ्या चढउतारांचा सामना करताना अनेकदा माणसं हरून जातात. यामध्ये मुख्य तणाव असतो तो कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा. तरुणपणात असे तणाव लीलया हाताळता येतात कारण जबाबदाऱ्यांचं ओझं नसतं. पण कालोघात प्रपंचाची रहाटी मागं लागते आणि माणूस गुरफटून जातो. पण हा गाडा हाकताना जेव्हा संकटं येऊ लागतात आणि ती गंभीर बनतात तेव्हा पुन्हा एकदा प्रपंच सोडून एकटेपणानं राहावं असं वाटू लागतं. काही जण तसं करतातही ! अनेक जण या ताणतणावांमुळं घर सोडून जातात आणि महानगरात एकट्यानं राहू लागतात. काही जण हिमालयात जातात; तर काही जण अन्य तीर्थस्थळी जाऊन संन्यास पत्करतात.

हे फक्‍त भारतातच घडतं असं नाही. परदेशातही घडतं. अनेक जण तिथं आर्थिक अथवा अन्य कारणांमुळे तणावग्रस्त होतात आणि सर्वकाही सोडून निर्जन ठिकाणी जाऊन राहतात. टॉम हॅंक्‍सचा “कास्ट अवे’ हा हॉलीवूडपट अनेकांना आठवत असेल. त्यामध्ये जहाजाच्या अपघातामुळे एका तरुणाला अनेक वर्षे एकाकीपणे एका निर्जन बेटावर काढावे लागतात, असे दाखवले आहे. कालांतराने त्याची तेथून सुटका करण्यात येते. अशाच प्रकारे एकेकाळचे ऑस्ट्रेलियामधले अब्जाधीश खाणउद्योजक आणि व्यावसायिक म्हणून ज्यांची ख्याती देशभरात होती ते डेव्हिड ग्लासीन गेल्या 20 वर्षांपासून एका निर्जन बेटावर राहत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

1987 साली आलेल्या आर्थिक मंदीमुळे आपली कोट्यवधीची संपत्ती त्यांनी गमावली. त्या दिवसापासून आपल्या आलिशान जीवनशैलीचा त्याग करून साऱ्या जगापासून दूर ते एका निर्जन बेटावर राहू लागले. एकटेपणा, नैराश्‍य, अपयश यासारख्या सगळ्या संकटांशी एकाकी लढल्यानंतर आपल्यासोबत निर्जन बेटावर राहण्यासाठी एका सोबतीची गरज आहे, असंही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)