अबाऊट टर्न: बोलबाला

हिमांशू

कुछ तो गडबड है! मधूनच “बॉंबे टू गोवा’ चित्रपटातला कंडक्‍टर आठवतो. त्यानं खादाड मुलाच्या तोंडाला बांधलेलं कापड आठवतं. मीडियासमोर ब्ला-ब्ला बोलणाऱ्या आपल्याच पक्षातल्या नेत्यांना तसंच कापड बांधावंसं वाटतं. पण लगेच स्वतःचीच जीभ कशी काय घसरते? तीही फुल कॉन्शस असताना! “इथं बोलू नये…’ अशी सुरुवात करून नितीन गडकरी जे बोलू नये तेच कसं काय बोलतात? कुछ तो गडबड है! बोलबच्चन स्वपक्षीयांना सबुरीचा सल्ला जेव्हा ते देत होते, तेव्हा पत्रकारांनी गडकरींना विचारलं, की देवाची जात आणि माणसाचं गोत्र शोधणाऱ्यांबद्दल असंच म्हणाल का? त्यावेळी “”ही विधानं विनोद म्हणून केली जात आहेत,” असं सांगून गडकरी मोकळे झाले. मोकळे म्हणजे नामानिराळे! परंतु त्यांना जे महत्त्वाचं सांगायचं होतं, ते असं की, त्यांच्या पक्षात म्हणजे भाजपमध्ये अनेक नेते असे आहेत, ज्यांना टीव्ही कॅमेऱ्यासमोर खूप खूप बोलायचं असतं.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अशा नेत्यांनी आता जीभ आवरती घेतली पाहिजे! संदेश योग्य; पण उद्देश गुलदस्त्यात! कारण माध्यमांचे प्रतिनिधी समोर असताना जाहीर कार्यक्रमात आपणही तेच करतो आहोत, याचं भान सल्ला देणाऱ्यालाच राहू नये का? असा प्रश्‍न निर्माण होणारच. हे सगळं ग

मतीजमतीत चालू असतं, तोपर्यंत ठीक आहे. पण कधीतरी रूळ बदलतात तेव्हा बोट मीडियाकडेच जातं!
“माध्यमांनी माझ्या विधानाचा विपर्यास केला,’ असं म्हणणारे गडकरी एकटेच नाहीत. असे नेते प्रत्येक पक्षात आहेत. त्यांना जे म्हणायचं असतं, ते म्हणून घेतात आणि नंतर माध्यमांनी आपलं वाक्‍य कसं संदर्भ सोडून वापरलं, मोडतोड करून छापलं, असं सांगतात. उदाहरणार्थ, “अपयशाची जबाबदारी नेतृत्वानं स्वीकारायला हवी,’ हे त्यांचं विधान! सहकारी संस्थांच्या व्यवस्थापनाबद्दल ते बोलत होते हे खरं. हे वाक्‍य ते पक्षनेतृत्वाला उद्देशून बोलले, असं मीडियाला उगीचच वाटलं, हेही घटकाभर खरं मानू! पण दुसऱ्याच दिवशी “”आमदार आणि खासदारांच्या सुमार कामगिरीची जबाबदारी पक्षाध्यक्षांवर असते,” असं विधान ते पुन्हा करतात तेव्हा “कुछ तो गडबड है’ असं वाटणं स्वाभाविक आहे की नाही? “”मी जर पक्षाध्यक्ष असेन आणि माझ्या पक्षाचे खासदार-आमदार चांगलं काम करत नसतील, तर त्याची जबाबदारी माझीच असेल,” असं म्हणून त्यांनी विषय स्वतःकडे वळवलासुद्धा! पण त्यांचं हे विधान “बॉंबगोळा’ होता, असं पत्रकारांना वाटलं, तर त्यातही वावगं काही नाही. कारण एकाच अर्थाची विधानं त्यांनी सलग दोन वेळा, वेगवेगळ्या ठिकाणी केली. नेतृत्वबदलाची मागणी थेट सरसंघचालकांपर्यंत पोहोचलीय, हे माहीत असताना कुणी एवढं बिनधास्त किंवा एवढं गाफील राहील?

गडकरी बिनधास्त आहेत की गाफील, हे कळेलच; पण सध्या त्यांचा “बोलबाला’ वाढलाय हे निश्‍चित! त्यांच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ मोडतोड करून व्हायरल झाला, ही बाब खरी! म्हणजे, जे त्यांनी यूपीए सरकारबद्दल म्हटलं, ते मोदी सरकारबद्दल म्हटलंय, असं भासवलं गेलं, हे खरंय! पण “तुम्ही उत्तम वक्ते असलात म्हणून निवडणुकीत विजय मिळत नाही,’ “माणसानं विनम्र असायला हवं,’ “आत्मविश्‍वास हवा; पण अहंकार दूर ठेवा’ असे सल्ले ते कुणाला देतायत? विरोधकांना?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)