पाकिस्तान:  पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या एका झालेल्या लग्नात नवऱ्या मुलानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतले. कारण त्याने चक्क 25 लाखांचे सोने अंगावर घातले होते. लाहोरमध्ये झालेल्या स्वागत समारंभात हा सोन्याचा नवरदेव पाहायला मिळाला. त्याने घातलेल्या सूटची किंमत 63 हजार रुपये इतकी होती. याशिवाय त्याच्या सूटवरील खड्यांची किंमत 16 हजार रुपये होती. ही सोनेरी यादी इथेच संपत नाही. गोल्डन सूटला सूट करणारा नवरदेवाचा गोल्डन टाय तब्बल 10 तोळ्यांचा होता. पाकिस्तानी चलनात त्याची किंमत साधारणत: 5 लाख रुपये इतकी होते.

याशिवाय या नवऱ्या मुलाचे बूटदेखील सोन्याचे होते. अनेकांना ते सुरुवातीला फक्त सोनेरी बूट आहेत, असे वाटले. मात्र काही वेळाने ते बूट सोन्याचे आहेत, हे उपस्थितांच्या लक्षात आले. हे बूट तब्बल 32 तोळ्यांचे होते. याची किंमत पाकिस्तानी रुपयात तब्बल 17 लाख रुपये इतके आहे. या गोल्डप्रेमी नवरदेवाचे नाव हाफिज सलमान शाहीद असे आहे. हा नवरदेव मोठा व्यावसायिक आहे. सध्या त्याच्या लग्नाच्या स्वागत समारंभाची चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)