…अबब! टॅंकरच्या वर्षभरात 1 लाख 98 हजार फेऱ्या

file photo

सुनील राऊत 

रु. 75 कोटी ‘पाण्यात’


 घशाची कोरड पडली महागात 


खासगी ठेकेदारांच्या खिशाला ‘ओलावा’


गावे हद्दीत आल्याने मागणी वाढल्याचे लंगडे कारण

पुणे- शहरात दोन वेळा आणि मान्यतेपेक्षा जास्त पाणीपुरवठा होत असल्याचा दावा जलसंपदा विभाग करतो. प्रत्यक्षात मात्र पाणीपुरवठ्याची स्थिती गंभीर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 अखेर महापालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्रांतून तब्बल 1 लाख 98 हजार 232 टॅंकर फेऱ्या झाल्या आहेत. हे पाहता, गेल्या वर्षभरात आपली तहान भागविण्यासाठी पुणेकरांना तब्बल 75 कोटी रुपये मोजावे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

-Ads-

बहुतांश भाग अजूनही तहानलेला
सर्वाधिक 1 लाख 1 हजार 458 टॅंकर फेऱ्या या ठेकेदारांच्या असून चलन घेऊन 75 हजार 530 फेऱ्या झालेल्या आहेत. तर महापालिकेने मोफत 21 हजार 244 टॅंकर फेऱ्याद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा केला आहे. गेल्या चार वर्षांतील शहरातील या सर्वाधिक टॅंकर फेऱ्या आहेत. एका बाजूला शहराला दोन वेळा पाणीपुरवठा केल्याचा दावा महापालिकेकडून केला जात असला, तरी अजूनही शहरातील बहुतांश भाग पाण्यासाठी तहानलेलाच असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

टॅंकरसाठी आकारला जातो “पाण्यासारखा पैसा’
मागील वर्षाची टॅंकरची आकडेवारी पाहता, गेल्या वर्षभरात पुणेकरांचे तब्बल 75 कोटी रुपये खर्ची सहज पडले असतील, असा दावा खुद्द पाणीपुरवठा विभाग अधिकाऱ्यांनी केला आहे. शहरात ज्या भागात पाणी नसेल, तेथे अगदी नाममात्र दरात पाण्याचे टॅंकर दिले जातात. तर दुसरीकडे ठेकेदार आणि चलनाद्वारे टॅंकरची रक्कम लिटरच्या क्षमतेप्रमाणे ठरवून देण्यात आली आहे.

त्यानुसार, 7 जलशुध्दीकरण केंद्रावरून हे टॅंकर ठेकेदार तसेच नागरिकांना पुरविले जातात. महापालिकेकडून ठेकेदारांना हा 10 हजार लिटर पाण्याचा टॅंकर 800 ते 900 रुपयांना दिला जातो. तर नागरिकांनी त्यांना टॅंकर त्यांनी 1200 रुपयांना देण्याच्या महापालिकेच्या सूचना आहेत. मात्र, प्रत्यक्षात टॅंकर भरणा केंद्रापासून असलेल्या अंतरावर नागरिकांकडून पैसे आकारून नागरिकांना हे टॅंकर 1800 ते 2500 रुपयांना दिले जात असल्याचे वास्तव आहे.

उपनगरांमध्ये मागणी अधिक
महापालिका हद्दीत प्रामुख्याने उपनगरांमध्ये पाण्याच्या टॅंकरची सर्वाधिक मागणी आहे. त्यात कोंढवा आणि वडगावशेरीसह, नगररस्ता परिसर आघाडीवर आहे. या भागात महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबत अनियमितता असल्याने टॅंकरची मागणी प्रचंड असल्याचे प्रशासनाच सांगत आहे. तर यापूर्वी हे पाणी टॅंकर ठेकेदारांकडून हद्दीलगतच्या गावांमध्ये बेकायदेशीरपणे विकले जायचे. मात्र, त्यातील बहुतांश गावे पालिकेत आल्याने टॅंकरची मागणी वाढल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

गेल्या चार वर्षांतील टॅंकरची स्थिती
वर्ष टॅंकरच्या एकूण फेऱ्या
2014-15…………1 लाख 58 हजार 169
2015-16…………1 लाख 79 हजार 764
2016-17…………1 लाख 77 हजार 596
2017-18…………1 लाख 98 हजार 232

असे आहे एका टॅंकरचे “अर्थशास्त्र’
7 जलशुध्दीकरण केंद्र
टॅंकर पाणीपुरवठ्यासाठी


800 ते 900 रु.
ठेकेदारांना मिळणारा टॅंकर


10 हजार लिटर
एका टॅंकरची क्षमता


1200 रु.
प्रति टॅंकर मोजण्याची सूचना


1800 ते 2500 रु.
टॅंकरसाठी प्रत्यक्ष किंमत


3000 रु. पेक्षा जास्त
बांधकामांना पाणीपुरवठा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)