अबब…!  गुगलवर ‘भिकारी’ सर्च केल्यास येतो इमरान खान यांचा फोटो

नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी गुगलवर ‘Idiot’ सर्च केल्यास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो येत होता. आता असाच एक प्रकरण पाकिस्तानमधून उघडकीस येत आहे. गुगलवर भिकारी सर्च केल्यास चक्क पाकिस्तान पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो दाखविला जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुगलवर उर्दूमधून भिकारी सर्च केल्यास इमरान खान यांचा फोटो दाखविण्यात येत आहे. याविरोधात पंजाब प्रांतातील विधानसभेमध्ये एक प्रस्ताव आणण्यात आला आहे. यामध्ये गुगल सीईओ सुंदर पिचाई यांना समन्स पाठविण्याचा प्रस्ताव आहे. पाकिस्तानच्या एका पत्रकाराने इमरान खान आणि या प्रस्तावाचा फोटो शेअर केला आहे.

डोनाल्ड ट्रम्पप्रकरणी स्पष्टीकरण देताना सुंदर पिचाई यांनी म्हंटले होते कि, गुगलचे सर्च इंजिन अल्गोरिदम आणि रिझल्ट देण्यासाठी अनेक फॅक्टर काम करत असतात. यानंतर मिळत्या-जुळत्या विषयांशी, प्रसिद्धी आदींचे विश्लेषण करून चांगले रिझल्ट देते.

दरम्यान, पाकिस्तान सध्या आर्थिक संकटांचा सामना करतो आहे. अर्थव्यवस्थेसाठी पाकिस्तान जागतिक स्तरावरून कर्ज घेण्याचा प्रयत्न करत आहे. मागील काही दिवसांमध्ये इमरान खान यांनी अनेक देशांचे दौरेही केले. यावरून सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हयरल झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)