अबब… ऐकावे ते नवलच !

मेहुल चोक्‍सीला भारत सरकारनेच दिले क्‍लिअरन्स सर्टिफिकेट


त्याच आधारावर दिले नागरीकत्व – अँटिग्वा सरकारचा दावा


मोदी सरकार येणार अडचणीत

नवी दिल्ली – भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, भारताचे पासपोर्ट ऑफिस आणि मुंबईच्या पोलिस आयुक्तालयाकडून कर्जबुडवून पळालेला मेहुल चोक्‍सी याला क्‍लिअरन्स सर्टिफिकेट देण्यात आले आहे. त्याच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे प्रमाण पत्र भारत सरकारने दिल्यामुळेच आम्ही त्याला आमच्या देशाचे नागरीकत्व दिले आहे अशी माहिती खुद्द अँटिग्वा सरकारने दिली आहे. अँटिग्वा सरकारच्या या खुलाशामुळे मोदी सरकार आता चांगलेच अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

भारतातील बॅंकांचे अब्जावधी रूपये बुडवून मेहुल चोक्‍सी आधी अमेरिकेला आणि तेथून तो अँटिग्वाला पळाला आहे. त्याला अँटिग्वा सरकारने त्या देशाचे नागरीकत्व दिले आहे. त्याला भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच अँटिग्वा सरकारने हा खुलासा केल्याने मोदी सरकार अडचणीत येणार आहे. चोक्‍सीला गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच त्या देशाचे नागरीकत्व आणि पासपोर्ट मिळाला आहे. विशेष म्हणजे शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सेबी या संस्थेनही त्याला तो सगळ्याच बाबीत क्‍लिअर असल्याचे सर्टिफिकेट दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2014 आणि 2017 मध्ये सेबीने त्याला अशी ऑल क्‍लिअरची सर्टिफिकीटे दिली असल्याचे अँटिग्वा सरकारने म्हटले आहे. ही सगळी कागदपत्रे तपासूनच आम्ही त्याला आमच्या देशाचे नागरीकत्व दिले आहे असेही त्या देशाच्या सरकारने म्हटले आहे. सीबीआयने त्याला अटक करण्यासाठी इंटरपोलच्या माध्यमातून नोटीस जारी केल्यानंतर अँटिग्वाने हा खुलासा केला आहे. त्यावर भारत सरकारचा अजून खुलासा आलेला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)