अबब… एक ते सव्वा किलोचा पेरू

आळंदीतील ग्राहक आवक : किलोसाठी 100 रुपये दर

आळंदी- मूळच्या थायलंडमधील जातीच्या पेरूची रायपूरहून आळंदीत आवक झाली. एका फळाचे 600 ते 1300 ग्रॅम एवढे वजन आहे. एका किलोसाठी या पेरूला 100 रुपये दर मिळाला आहे.
आकाराने व वजनाने हा पेरू मोठा असल्याने ग्राहक त्याची उत्सुकतेने खरेदी करीत आहेत. काही वर्षांपासून रायपूरहून पेरूची आवक होत आहे. ग्राहकांसोबत फळविक्रेते देखील किरकोळ विक्रीसाठी पेरूची खरेदी करतात. स्थानिक भागातील आणि रायपूर येथील पेरूमध्ये काही प्रमाणात फरक असल्याचे निरीक्षण कटके यांनी नोंदविले. स्थानिक आणि रायपूरच्या पेरूचा रंग सारखा आहे. परंतु, दोन्हींच्या आकारात फरक आहे. रायपूरचा पेरू चार दिवस टिकू शकतो; तर शीतगृहात आठ दिवसांपर्यंत टिकू शकतो. स्थानिक भागातील पेरू दुसऱ्या दिवशी पिवळा होतो. तसेच पेरू गोडही असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
या पेरूचा उगमहा मध्य प्रदेशातील रायपूर येथील आहे, त्यामुळेच या पेरूला रायपूर पेरू असे नाव पडले आहे 600 ते 1300 ग्रॅमच्या आसपास म्हणजेच अर्धा ते एक किलोच्यावर वजन असलेल्या रायपूर जातीच्या पेरूचा हंगाम सुरू झाला आहे. दिसायला मोठा असल्याकारणाने ग्राहक पेरूकडे बघून आकर्षित होत आहे. यामध्ये बिया नसल्याने तसेच चवीला गोड असल्याने याची ग्राहकांकडून मागणी होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या पेरूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सातारा, बारामती येथील शेतकरी घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पेरू आकर्षक वेष्टनात ठेवलेला असल्यामुळे सध्या बाजारात उठून दिसत आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)